logo

पुढच्या मुलीसारखं केला सांभाळ एका कुत्र्याचा मुख्य जनावराची घेतली काळजी

👉 पोटचा मुलीसारखं केला सांभाळ.....
घटना 30 मे 2021 कोविड सारख्या महामारी मध्ये त्या कुत्र्याचा मालकाला कोविड झाला, त्यामध्ये त्याला हॉस्पीटल मधे भरती करण्यात आले, तब्येत त्यांची ढासळत चालली होती, संपूर्ण परिवार कोविडमध्ये संपून गेला, आपल्यानंतर घरी असणाऱ्या कुत्र्याचं काय होणार याची चिंता त्या मालकाला सतावू लागली, त्याने
मरताक्षणी त्याच्या मित्राला सांगितलं की घरी असणारा कुत्रा चांगल्या व्यक्तीकडे दे, त्याचे पालन पोषण चांगले झाले पाहिजे, माझ्या अर्धा जीव त्याचात आहे, असे सांगितले, तिथून काही दिवसात मालकाचा मृत्यू झाला, घरी ओसाड पडलेले, घरचा कर्ता पुरुष निघून गेला, एरियातील लोकांनी काही दिवस त्याला जेवण पाणी दिले, काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला, ग्रेटडेन जातीची एक कुत्री असल्याचे सांगितले, आणि सांगितले की मालकाची मरतेवी इच्छा होती म्हणून, आम्ही नागपूर गाठले, तिथे जाऊन पाहिले असता, त्या कुत्रीला राहायला छान घर, तीची चांगली व्यवस्था असून कुलर लागलेला होता, मी आणि माझ्या मित्राने तिला सावनेरला घेऊन आलो, काही दिवस मी माझ्या घरी ठेवले, पण तिच्या खर्च खूप असल्याने ते आपल्या डोक्या पलीकडे होतं, आपण बऱ्याच डॉग लवर , रेस्क्यू सेंटर आणि कुत्र्यांसाठी समोर येणाऱ्या व्यक्तींना विनवणी केली, पण मला माहिती नव्हतं की ते खरंच कुत्र्यांसाठी मनापासून काम करतात, ते करतात ते फक्त दिखावा,
कोणीच तिला ठेवायला तयार नव्हतं, काही लोकांनी तीला एक दोन दिवस घरी ठेवलं, या आशेने की तिच्यापासून काही पिले तयार होणार, आणि आपण ते विकून टाकू, या स्वार्थापायी काही लोकांनी तिला एक-दोन दिवस आपल्या घरी ठेवलं पण,
शेवटी ही बाब आमचे मित्र प्रफुल भाऊ कापसे यांना सांगितलं, तिची परिस्थिती सांगितली, भाऊला सांगितलं भाऊ हिच्या मालकाची इच्छा होती, की तिच्या चांगला सांभाळ झाला पाहिजे, तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळेल, प्रफुल भाऊने काही विचार न करता घेऊन येण्यास सांगितले, भाउने तिला आपल्या बंगल्यावर ठेवले, ऑलरेडी भाऊ कडे लेब्राडोर जातीचे दोन कुत्रे आहेत, प्रफुल भाऊ आपल्या कामात असताना सुद्धा, तिला कोणताच गोष्टीची कमी होऊ दिली नाही, तिच्यासाठी वाटेल ते सर्व प्रफुल भाऊने केलें, एक स्पेशल डॉक्टर तिच्यासाठी लावलेला, तिच्यासाठी लागणारा सर्व खर्च भाऊने केला, गेल्या तीन वर्षात आज पर्यंत कमीत कमी दीड लाखापेक्षा जास्त खर्च तिच्यावर झाला, तिच्या पायात किडे पडलेले होते, त्याच्यावर सुद्धा प्रॉपर उपचार भाऊ ने केला, भाऊ ने तिचं नाव डेजी ठेवले, हळूहळू ती सर्वात मिसळू लागली, कदाचित तिला प्रफुल भाऊ मध्ये तिच्या मालक दिसत होता, प्रफुल भाऊ किती कामात असले तरी पोरांना कॉल करून सांगायचे, तिच्या जेवणापावण्याची व्यवस्था सुरू करायची, तिला काहीच कमी न पडू देण्याची जणू भाऊ न शपथ घेतली होती , पण दिनांक १ मे 2024 रोजी अखेर तिच्या मृत्यू झाला ,आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली, काल प्रफुल भाऊला वैष्णोदेवी जायचं होते, भाऊने मला कॉल करून सांगितले, मी वैष्णवी साठी निघालो, पण जाता जाता एक शेवटचं काम करून दे, तिचा अंतिम संस्कार आपल्या शेतावरच कर, आणि तिथेच गड्डा कर,50 झाड तिच्या नावाचे लावायचे आहे असं प्रफुल भाऊने सांगितलं, आम्ही विधीवत तिचा अंतिम संस्कार केलं, आणि तिथे 50 झाडे लावण्याचे ठरवलं, आज तिच्या मालकाच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, आणि त्याने प्रफुल भाऊला मनातून आशीर्वाद दिला असेल, की माझी इच्छा पूर्ण झाली, प्रफुल भाऊच्या या कार्याला मनापासून सलाम करतो
,
मानवता हाच खरा धर्म
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या
पुन्हा एकदा प्रफुल व कापसे मनापासून धन्यवाद
प्रफुल भाऊ कापसे दिलदार भाउ ❤️
चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

255
5629 views